TET घोटाळ्यात कारवाई, राज्यातील ७,८०० बोगस शिक्षकांची यादी तयार

Investigate the TET exam scam through SIT
Investigate the TET exam scam through SITsakal

टीईटी परिक्षेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पुणे पोलिसांनी याआधी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांपासून शिक्षण विभागातील काही जणांना ताब्यात घेतलं आहे. आता यामध्ये आणखी महत्वाचा खुलासा झालाय. पुणे पोलिसांनी गतीने तपासाची चक्र फिरवत पैसे भरून शिक्षक झालेल्यांची यादी तयार केली आहे. त्यामुळे अशा ७, ८०० बोगस शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. (TET Exam Scam)

Investigate the TET exam scam through SIT
धक्कादायक : TET च्या 7800 अपात्र उमेदवारांना पैसै घेऊन केले पात्र

शिक्षण परिषदेच्या आयुक्तापासून अनेकांचा गैरप्रकारात समावेश असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2020) प्रकरणात सात हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचं समोर आलं होतं. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झालं. यानंतर आता संबंधित बोगस शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे. (Fraud In TET Exam)

राज्यातील बोगस शिक्षकांविरोधात पोलिसांनी दंड थोपटले आहेत. या शिक्षकांवरचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे.

२०१९-२० साली झालेल्या टीईटी परिक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम १६ हजार ७०५ पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुरावा याचा एकत्रित तपास.

तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मुळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या परीक्षार्थींची संख्या आणखी वाढ होवू शकते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकारांशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com