"विनामास्क'च्या दंडातून साडेसहा कोटी; पोलिसांना मिळणार निम्मी रक्कम 

police
police

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्या दीड लाख नागरिकांकडून पुणे पोलिसांनी साडेसहा कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यातून पोलिसांना निम्मी रक्कम मिळणार असून, त्यातून प्रत्येक पोलिस ठाण्याला प्रत्येकी तीन लाख रुपये देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

पोलिस आयुक्तालयात सोमवारी दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी गुप्ता यांनी पत्रकाराशी संवाद साधला. 

गुप्ता म्हणाले, "विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून साडेसहा कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील निम्मी रक्कम पोलिसांना मिळणार आहे. पोलिस ठाण्याच्या परिसरात कोणत्या सुधारणा करता येईल, याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. तसेच एखादा चांगला उपक्रम राबविण्याचाही विचार करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गौतम पाषाणकर स्वतःहून बेपत्ता 
व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत ते कुठे कुठे गेले, याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या शोधासाठी 20 पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहेत. त्यामागे कोणताही गुन्हा नाही अथवा त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ते स्वत: निघून गेले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस कोठडीवर सीसीटीव्हीची नजर 
राज्यातील पोलिस कोठडीतील मृत्यूंमध्ये घट व्हावी, यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच पोलिस कोठडीत सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. 

बाजारपेठेतील गर्दी टाळावी 
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात मध्यवस्तीमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. तेथे सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी, गर्दी करू नये, असे आवाहन गुप्ता यांनी केले. गर्दी नियंत्रण करण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पोलिस कर्मचारी दिले आहे. गरज भासल्यास आणखी मनुष्यबळ दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com