

Pune police inspector transfer news
sakal
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील २५ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामध्ये सहा पोलिस निरीक्षकांकडे पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. तसेच, तीन सहाय्यक आयुक्तांसह गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांच्याही युनिटअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.