पुणे : मृतदेहानेच आणला पुरावा समोर अन् मित्र झाला गजाआड

pune
pune

पुणे : 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे कुठलाही पुरावा न ठेवता केलेला खून अखेर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत उघडकिस आणला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

शिक्रापुर येथील व्यावसायिक हनुमंत ऐवळे हे 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशनला ऐवळे हे बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी दिली होती. तर शिक्रापुर पोलिसांनीही बेपत्ता प्रकरण फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचे परिसरात चर्चा होती. दरम्यान, 10 ऑक्टोबरला बुर्केगाव (ता. हवेली) येथील भिमा नदी पात्रामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले होते. सदर मयताची ओळख पटविणे हे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. या प्रेताची ओळख पटविली असता हे प्रेत बेपत्ता हनुमंत यांचेच असल्याचे निष्पन्न झाले होते. मयत ओळख पटल्यानंतर खुनाचे कारण शोधणे व अनोळखी आरोपींना अटक करणे हे महत्वाचे अन क्लिष्ट काम पोलिसांसमोर होते. मारेकऱ्यांनी खून करताना कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत तपासासाठी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला सुचना दिल्या. यावेळी तपास करताना, सदरचा खून हा आर्थिक कारणावरुन झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी सापळा रचुन सोमनाथ मारुती भुजबळ, सुमित संपत नरके (दोघेही रा. तळेगाव ढमढेरे) यांना ताब्यात घेतले. त्यावेळी वरील दोन्ही आरोपींनी एक साथीदार यांच्यासमवेत आर्थिक वादामुळे खुन केल्याचे कबुल केले.

मृत हनुमंत ऐवळे यांच्याकडुन आरोपी सोमनाथ याने उसने पैसे घेतले होते. ते पैसे सोमनाथ भुजबळ हा देत नसल्याने त्यांच्यात काही दिवसांपुर्वी वाद झाला होता. नंतर सोमनाथ भुजबळ याने हनुमंत याचा काटा काढण्यासाठी त्याच्या मित्रांच्या मदतीने दृश्यम सिनेमाप्रमाणे कट रचुन कोणताही पुरावा मागे न ठेवता हनुमंत यास महिंद्रा वाहनात बसवुन दोरीच्या साहाय्याने गळा आवळुन खुन करुन मृतदेहास दोरीने बांधुन त्याला दगड बांधुन भिमा नदीत टाकुन देउन पुरावा नष्ट केला होता.

आरोपींनी खुन करताना कोणताही पुरावा मागे न ठेवता अत्यंत हुशारीने गुन्हा केलेला होता. गुन्हा अत्यंत क्लिष्ट असुनही तांञिक व कौशल्यपुर्ण तपास करत खुनाचा गुन्हा उघडकिस आणला व आरोपींना गजाआड़ केले आहे. हा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्ताञय गुंड, दत्ताञय गिरमकर, राजु मोमीन, दयानंद लिमन, उमाकांत कुंजीर, विजय कांचन, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, धिरज जाधव, अक्षय जावळे यांनी करत खुनाचा उघडकिस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com