Pune Police News | पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज, आमरण उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांना हटवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune crime

पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज, आमरण उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांना हटवलं

पुण्यातील कात्रजमध्ये पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही विकास न झाल्याने आमरण उपोषण सुरू होतं. मागील दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत गावकऱ्यांना हुसकावून लावलं.

हेही वाचा: धानोरी अतिक्रमण कारवाई : पोलीस जेवायला गेले अन् जमावानं पालिका कर्मचाऱ्यांना बदडलं!

कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून उपोषण सुरू होतं. नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध सुरू होता. पुणे महापालिकेत कात्रजचा समावेश होऊन २५ वर्ष लोटली, तरी मूलभूत सुविधा व विकास होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

महापालिका प्रशासन व राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत असून न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी नमेश बाबर यांनी कात्रज चौक येथे आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी कात्रजसह, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडीतील नागरिक देखील उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करत हे आंदोलन बंद पाडलं.

कात्रज व अन्य समाविष्ट गावातील पाणीप्रश्न, वाहतुकीची समस्या यासह महापालिकेचा दवाखाना, खेळाची मैदाने, ई-लर्निंग स्कूल, स्वारगेट-कात्रज मेट्रो अशा प्रकल्पाबाबत अन्याय झाल्याची नागरिकांची संतप्त भावना आहे.

Web Title: Pune Police Lathi Charge In Hunger Strike Over Villages Merger In Pmc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsPune Crime News
go to top