
पुणे : शहरात ‘स्ट्रीट क्राइम’चे प्रमाण वाढले असून, महिलांची छेडछाड, चोरट्यांकडून पादचारी ज्येष्ठ नागरिक, महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार सुरू आहेत. गुंड टोळ्यांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, मारहाण करून दहशत माजविण्याच्या घटना घडत आहेत. अशा गुंडांना वठणीवर आणण्यासह पोलिस घटनास्थळी जलद गतीने पोचावेत, यासाठी पुणे पोलिसांकडून ‘कॉप-२४’ बीट मार्शल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.