

Police teams are taking action not only against drug peddlers but also against individuals found consuming cannabis under the NDPS Act.
Sakal
पुणे : शहरात मोकळ्या जागा, नदीपात्र आणि ओढ्याकाठी बसून गांजा फुंकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘मिशन क्लीन’ हाती घेतले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांनी हॉटस्पॉट्सवर छापेमारी सुरू केली आहे. गांजा विक्रेतेच नव्हे तर प्रत्यक्ष गांजाचे सेवन करणाऱ्यांनाही रंगेहात पकडून गुन्हे दाखल केले जात आहेत.