
वारजे : वारजे माळवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत विकी ऊर्फ गंग्या विष्णू आखाडे (वय २७) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि एका जिवंत काडतुसासह अटक केली. आखाडे हा खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि वाहनांची तोडफोड यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही सामील आहे.