
Cockfighting Racket Busted: Pune Police Nabs Six at Empress Garden
Sakal
पुणे : घोरपडीतील एम्प्रेस गार्डन परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळण्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. मोकळ्या जागेत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत सहा कोंबडे, पाच मोबाईल, तीन दुचाकी आणि रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.