success story of tribal candidates in Maharashtra police
esakal
दावडी : श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) येथील कव्हाळा ठाकरवाडी परिसरातील आदिवासी समाजातील जयश्री सहादू गावडे आणि राहुल विलास पारधी या मावशी-भाच्याची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.