

Success of CEIR Portal in Tracking Stolen Mobile Phones
Sakal
पुणे : चोरीस गेलेले मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि विविध गुन्ह्यांतील जप्त केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना वितरित करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. महाराष्ट्र पोलिस रेजिंग डे-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ आणि मुद्देमाल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.