धक्कादायक : पुण्याजवळ अल्पवयीन मुलांकडे सापडला दोन किलो गांजा

Ganja
Ganja

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला धरणा मागील स्मशानभूमीजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास हवेली पोलिसांनी छापा टाकून दोन किलो गांजा सह दोन अल्पवयीन तरुणांना रंगेहात पकडले आहे. तरुणांकडे दोन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व दोन किलो वजन असलेला गांजा आढळून आला आहे.

हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना पोलीस मित्रांच्या माध्यमातून स्मशानभूमीजवळ दोन अल्पवयीन तरुण गांजा विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ अशोक शेळके यांनी हवलदार संजय शेंडगे, पोलीस नाईक रामदास बाबर, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे, चालक प्रकाश कोंढाळकर व पोलीस मित्रांसह स्मशानभूमी जवळ जाऊन सदर अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन किलो वजनाचा गांजा व इलेक्ट्रॉनिक वजन काटा आढळून आला.

'गेल्या काही दिवसांपासून खडकवासला व परिसरामध्ये हवेली पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक गावांमधून पोलिस मित्रांची मदत घेतली जात आहे. गांजा विकण्यासाठी अल्पवयीन तरुणांचा वापर केला जात आहे. यामागे इतर कोणाचा हात आहे का याचा कसून शोध घेतला जाणार आहे. नागरिकांना अशा अवैध धंद्यांबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ हवेली पोलिस स्टेशनशी संपर्क करावा,"अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com