पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

पुणे पोलिसांचा सेन्स ऑफ ह्युमर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नववर्षाच्या सुरवातीला देखील अशाच मज्जेशीर उत्तरांमुळे पुणे पोलिस चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या विनोदी शैलीचे कौतुक सोशल मिडियावर होत आहे. 

पुणेे : पुणे पोलिसांची हजरजबाबीपणा सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. नुकताच पुणे पोलिसांना टॅग करुन एकाने फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवर पुणे पोलिसांनी दिलेले मजेशीर उत्तर सध्या ट्विटरवर व्हायरल झाले आहे.

एका व्यक्तीने ट्विटरवर पुणे पोलिसांना टॅग करुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील दुचाकीच्या नंबर प्लेटवर राजाचे मुकुट डिझाईन असल्याचे दिसत आहे. त्यावर, दुर्दैवाने, आदरणीय महाराज, यांना दंड भरावा लागेल ,असे पुणेरी शैलीत सरकॅस्टीक उत्तर  पोलिसांनी दिले आहे. पुणे पोलिसांच्या या उत्तराला पुणेकरांनी चांगलीच दाद दिली आहे. 

डिझायनर नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर असल्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. पोलि दंडस्वरुप चलन आकारले जाते. त्यामुळे पुणे पोलिसांनी संबधित व्यक्तीलाही दंड आकरण्यात येईल असे पुणेरी शैलीत सांगितले आहे.

पुणे पोलिसांचा सेन्स ऑफ ह्युमर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नववर्षाच्या सुरवातीला देखील अशाच मज्जेशीर उत्तरांमुळे पुणे पोलिस चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या विनोदी शैलीचे कौतुक सोशल मिडियावर होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police Sence Of humor is trending on twitter