esakal | Video:गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा विशेष लघुपट; तुम्ही पाहिला का?
sakal

बोलून बातमी शोधा

pune police special short film covid19 and ganapati festival

वारकरी संप्रदायाची शतकांची परंपरा लाभलेली वारी कोरोनामुळे यंदा अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आली.वारी साध्या पद्धतीने होत असेल तर मग गणेशोत्सव साध्या पद्धतीने का नाही ?

Video:गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा विशेष लघुपट; तुम्ही पाहिला का?

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे

पुणे : "बाहेर नेले तर बाप्पाला कोरोना होणार नाही, पण गणेशोत्सवात, विसर्जनासाठी आपण मोठ्या संख्येने घराबाहेर पडलो तर आपल्याला कोरोना होण्याचा धोका आहे. त्यामुळे यंदा घरीच करा बाप्पाचे विसर्जन" अशा संवादाद्वारे जनजागृती करणारा खास लघुपट पुणे पोलिसांनी तयार केला आहे. त्यास पुणेकरांडुन तितकाच सकारात्मक व चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येेथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी गणेशोत्सवात घराबाहेर पडू नये तसेच, घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे, यासाठी नागरीकांमध्ये जागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास लघुपट तयार करण्यात आला आहे. 
महापौर मुरलीधर मोहोळ व पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या लघुपटामध्ये अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रुती मराठे, पौर्णिमा मनोहर, अभिनेता ओम भुतकर, क्षीतिज दाते, शिवराज वायचळ, बालकलाकार रेणुका राहुल देशपांडे यांनी त्यामध्ये अभिनय केला आहे. दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे. कथा विनोद सातव यांची असून, अभिनेता सुबोध भावे यांनी विशेष सहकार्य केले आहे. तर, लघुपटाची संकल्पना व निर्मिती उद्योजक पुनीत बालन यांनी केली आहे.

वारी साध्या पद्धतीने मग गणेशोत्सव साध्या पद्धतीने का नाही?
वारकरी संप्रदायाची शतकांची परंपरा लाभलेली वारी कोरोनामुळे यंदा अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आली.वारी साध्या पद्धतीने होत असेल तर मग गणेशोत्सव साध्या पद्धतीने का नाही ? असा सवाल या लघुपटाद्वारे भाविकांसमोर उपस्थित करीत त्यांना गणेशोत्सवात घराबाहेर न पडण्याचे आवाहन पुणे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

loading image