पुणे - शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नऊ पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या ५७ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. त्याची बाजारभाव किंमत सुमारे सात कोटी ७६ लाख रुपये इतकी आहे.
या अमली पदार्थांमध्ये गांजा, मेफेड्रोन, कोकेन, एल.एस.डी., चरस, अफिम पॉपीस्ट्रॉ, हेरॉइन आणि गांजा मिश्रित बंटा गोळ्यांसह एकूण ७८९ किलो इतक्या वजनाच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हा जप्त मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीतील भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ड्रग डिस्पोजल कमिटी गठित करण्यात आली.
या प्रक्रियेस पारदर्शकता यावी म्हणून कमिटीचे सदस्य म्हणून पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, डॉ. संदीप भाजीभाकरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-एकचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुजित वाडेकर आणि त्यांच्या पथकांनी विशेष पाठपुरावा केला. पोलिस दलाच्या या कठोर उपाययोजनांमुळे समाजात अमली पदार्थांच्या सेवनाला आळा बसण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.