
उरुळी कांचन - लोणी काळभोर परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण करणे, यांसह विविध गुन्हेगारी कृत्य करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या सोन्या ऊर्फ निखील घायाळ याच्यासह त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे.