
वारजे : वारजे माळवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणारी वारजे माळवाडी पोलिस चौकी गेल्या २० वर्षांपासून एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये कार्यरत असून यामुळे पोलिस कर्मचारी आणि तक्रारदारांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अपुरी जागा आणि पावसाळ्यात गळणारे छत अशा अनेक समस्यांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.