आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी आता पुणे पोलिस घेणार पुढाकार; असा आहे प्लॅन

Pune police will now take initiative to prevent suicide incidents
Pune police will now take initiative to prevent suicide incidents

पुणे : मागील काही दिवसांपासुन शहरात सातत्याने घडणाऱ्या आत्महत्येच्या घटनामुळे सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच पोलिसही चिंतेत आहेत. परंतु आत्महत्येच्या प्रश्नावर केवळ चिंता व्यक्त न करता त्यापलिकडे जाऊन या आत्महत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडुन पुढाकार घेतला जात आहे. त्यानुसार सर्वेक्षण, प्रशिक्षण, संवाद व समुपदेशनच्या पातळीवर पुणे पोलिस नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरात मागील 5 ते 6 दिवसात वेगवेगळ्या कारणामुळे 10 जणानी आत्महत्या केली. चार घटनापैकी एका घटनेत संपूर्ण कुटुंब, तर तीन घटनामध्ये पतीच्या मृत्युमुळे पत्नीने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. मागील वर्षीच्या मार्च (आत्महत्या 54) एप्रिल (64) व मे (50) महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या मार्च (45), एप्रिल (28) व मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत (18) आत्महत्या काही प्रमाणात कमी झाल्या.मात्र लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील होताच आत्महत्येच्या घटना सातत्याने घडु लागल्या. विशषत: एका पोलिस कर्मचाऱ्यानेही काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणातुन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना घडली.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
---------
दिवसेंदिवस वाढत असलेल्या आत्महत्येच्या घटनामुळे पोलिसांकडुनही चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या साप्ताहिक बैठकीत हा मुद्दा मांडला. त्यावेळी या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलण्याबाबत डॉ.वेंकटेशम यांनी सांगितले होते. त्यानुसार, अशा घटना घडु नयेत यासाठी पोलिस ठाण्याच्या पातळीवर या घटनाची गांभीर्याने दखल घेणे, वेगवेगल्या पद्धतीने पोलिसांचा नागरीकांशी संवाद वाढविणे, नागरीकांचे समुपदेशन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 

पोलिस नियंत्रण कक्ष, बीट मार्शलला देणार समुपदेशनाचे धडे
पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर उपलब्ध असणारे व  पोलिस ठाण्याचे गस्तीवर असणारे बीट मार्शल पोलिस कर्मचारी हे सर्वसामान्य नागरीक किंवा पीडित व्यक्तिच्या पहिल्यांदा संपर्क साधतात. त्यामुळे त्यांना समुपदेशनाचे धडे शिकविले जाणार आहेत. त्याचा उपयोग नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी होऊ शकतो, असे डॉ.वेंकटेशम यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचा आधार मिळाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी मार्च ते मे या कालावधीत आत्महत्या 38 टक्के आत्महत्या कमी झाल्या. त्यानंतर या घटना सतत घडत असल्याने आम्ही सर्वेक्षण, संवाद, समुपदेशन, तत्काळ प्रतिसाद यांच्यावर भर दिला आहे. एसएनडीटीकडुन सर्वेक्षण केले जाणार आहे. या अभ्यासातुन येणारी कारणे शोधुन त्यादृष्टिने उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - डॉ.के.वेंकटेशम,पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com