Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Ajit Pawar Critisises BJP Rule : पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेमुळे शहराचे अतोनात नुकसान झाल्याची टीका अजित पवारांनी कर्वेनगरमधील सभेत केली. पाणीटंचाई, खड्डे आणि वाहतूक कोंडी हे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्याचे आवाहन त्यांनी केले.
Deputy CM Promises Integrated Development of Pune City

Deputy CM Promises Integrated Development of Pune City

sakal

Updated on

वारजे : “पुणे शहरामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना पिण्याचे पाणी मिळत नाही, मात्र पुणे महापालिका नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरली आहे,” अशी जोरदार टीका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कर्वेनगर येथील जाहीर सभेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com