Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात अग्रवाल बाप-लेकाला जामीन; चालकाच्या अपहरणाचा केला होता प्रयत्न

Pune Porsche Accident Latest update : चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात, बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याचा मोबाईल फोन काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला होता.

Pune Porsche Accident
Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

तक्रारदार चालक हा पोर्श कार अपघात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. आरोपी बापलेकांनी चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवत अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. तक्रारदाराचे कपडे आरोपींच्या बंगल्याच्या खोलीतून जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींनी छेडछाड केली असून, आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा पुराव्यात छेडछाड करू शकतात. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा तपासात अडथळे आणू शकतात, असा युक्तिवाद करत सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला होता.

Pune Porsche Accident
Uddhav Thackeray: अब्दुल सत्तार अन् सुधीर मुनगंटीवार माफी मागणार का? ; अंबादास दानवेंचा बचाव करतांना उद्धव ठाकरेंचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com