Pune Porsche Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अग्रवाल पती-पत्नीस ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porsche Accident Latest News : शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
Pune Porsche Accident |Aneesh Awadhiya
Pune Porsche Accident |Aneesh AwadhiyaEsakal

पुणे, ता. २ : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अग्रवाल पती-पत्नीस येथील विशेष न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे.

वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी) यांना रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. तर या सर्वात विशाल अग्रवाल यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार विशाल यांना शनिवारी संध्याकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्हात अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल यांना अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे.

आई-वडील व आजोबा अटकेत, मुलगा सुधारगृहात

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. तर या गुन्ह्यात मुलाचे वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली होती. त्या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Porsche Accident |Aneesh Awadhiya
Pune Porsche Accident : अगरवाल कुटुंबीयांचे MPG Club रिसॉर्ट सील; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाबळेश्वरात मोठी कारवाई

तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ

अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.

विशाल अग्रवालसह पब मालकांच्या जामिनावर बुधवारी सुनावणी

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जाबाबत पोलिसांनी त्यांचे म्हणणे शनिवारी (ता.१) सादर केले आहे. आरोपींच्या अर्जावर आता बुधवारी (ता. ५) सुनावणी होणार आहे.

अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यास बचाव पक्षाने विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पोलिसांना शनिवारी (ता. १) आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केली आहे.

Pune Porsche Accident |Aneesh Awadhiya
Pune Car Crash: फील्ड ऑपरेशन, टेक्निकल ॲनालिसिस...पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या 12 टीम, 100 पोलीस, तपासात काय समोर आलं?

आतापर्यंत यांना झाली आहे अटक

- अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम

व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल

- मुलाची आई शिवानी विशाल अग्रवाल

- मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल

- कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा

- कोझी पबचे व्यवस्थापक सचिन अशोक काटकर

- ब्लॅक पबचे व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे

- कर्मचारी नीतेश धनेश शेवानी

- ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर

- ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे

- आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर

- शिपाई अतुल घटकांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com