
पुणे : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्याचा पुणे पोलिसांनी केलेला अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजेबी) आज फेटाळला. त्यामुळे मुलावर तुर्तास अल्पवयीन मुलांच्या तरतुदीनुसार खटला चालणार आहे.