Pune : अनुदानापासून वंचित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावेत; मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे येथे शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता.२२) दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal
Updated on

मंचर - मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याकारणाने अपात्र ठरलेल्या अर्जाबाबत सकारात्मक निर्णय घेणेच्या सूचना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमिरे यांच्याशी चर्चा करून दिले आहेत.

Dilip Walse Patil
Pune Crime : पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणात महिलेसह ९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

त्यामुळे अपात्र झालेल्या आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील दोन हजार ८७८ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकूण आठ कोटी १८ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे येथे शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता.२२) दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी एन काळे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक निलेश थोरात, सोमनाथ काळे, अरुण बांगर, संदीप चपटे, व बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे उपस्थित होते.

Dilip Walse Patil
Mumbai Fraud : गुप्तहेर संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगून करोडोची फसवणूक; तोतया अधिकारी अटकेत

“मंचर व लोणी येथे बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या कांदा अनुदानासाठी पाच हजार ३६ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची तपासणी केल्यानंतर दोन हजार १५८ अर्ज पात्र झाले आहेत. त्यांना आठ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

पण उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याकारणाने दोन हजार ८७८ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले होते. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांना अनुदान देवून न्याय द्यावा.” अशी मागणी सचिन पानसरे व निलेश थोरात यांच्यासह संचालक मंडळाने यावेळी केली होती.

यावेळी झालेल्या चर्चेत जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता बगाटे यांनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uproar Over Tantamukti Committee Chairman Election in Nirgudsar Gram Sabha; Sarpanch Objects to Selection Process
National Sarpanch Sansad office-bearers Yogesh Patil, Prakash Mahale and Sachin Bangar felicitating Nirgudsar Sarpanch Ravindra Walse Patil following his appointment as Ambegaon taluka president.
Pune Nashik High Speed Railway Demand Gains Momentum As Dileep Walse Patil Leads All Party Road Block Protest In Ambegaon
Former Home Minister Dilip Walse Patil addresses the media through a video message in Ambegaon.
Marathi News Esakal
www.esakal.com