
पुणे : ‘‘आम्हाला राजस्थानला राखी पाठवायची आहे. मी व माझी आई गेल्या चार दिवसांपासून सिटी पोस्टला राखी पाठवायला येतोय; परंतु, संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) अद्ययावत होत आहे, असे सांगून राखी न घेतल्याने तीन वेळा माघारी गेलो. आज पुन्हा १२ वाजता आलो तर राखी स्वीकारत आहेत, मात्र अडीच वाजले तरी रांगेत उभा आहे. टपाल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे आमचा वेळ वाया जात आहे,’’ अशा शब्दांत भवानी पेठेत राहणाऱ्या सहदेव भाटी या तरुणाने संताप व्यक्त केला.