

Heavy rains have left Pune roads riddled with potholes, causing severe traffic congestion, slowing daily commutes and increasing the risk of accidents across the city.
Sakal
पुणे : शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीचे केवळ सोपस्कार पार पाडले जात आहेत. दुरुस्त केलेले खड्डे २४ तासही टिकत नाहीत. परिणामी चालकांवर जीव मुठीत घेऊन वाहने चालविण्याची वेळ आली असून खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.