Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

पुणे कारागृह पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले तरी, अद्याप उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि नियुक्ती (जॉइनिंग) प्रक्रिया रखडली आहे.
Pune Prison

Pune Prison

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - पुणे कारागृह पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले तरी, अद्याप उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि नियुक्ती (जॉइनिंग) प्रक्रिया रखडली आहे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम निवड यादी जाहीर होऊनही नियुक्तीचे आदेश मिळत नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये चिंतेचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर जिल्ह्यांतील पोलिस भरतीची प्रक्रिया पुढे गेली असताना उमेदवारांना मात्र प्रतीक्षाच करावी लागत असल्याने उमेदवारांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com