
पुणे : संस्थांतर्गत बदली झाल्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील जवळपास १६० प्राध्यापकांचे पगार ऐन उत्सव काळात थकले आहेत. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना अचानक पगार रखडल्याने प्राध्यापकांची ओढाताण होत असून, उत्सव साजरा करायचा कसा? असा प्रश्न प्राध्यापकांना पडला आहे.