Pune : 'कामे होणार असतील तरच लोकांना आश्वासने द्यायला हवीत'; चंद्रकांत पाटलांचं विधान

कोंढव्यातील टिळेकर नगर-कामठे पाटीलनगर ते येवलेवाडी मुख्य रास्त्याच्या १८ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
Pune
Pune sakal

Pune - कामे होणार असतील तरच लोकांना आश्वासने द्यायला हवीत, कामे पूर्ण होणार नसतील तर मनमोकळेपणाने लोकांना ती होणार नाहीत असे सांगावे, लोकही ते स्विकारतात, असे मत राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Pune
Pune: किल्ले राजगडच्या पायथ्याशी आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

कोंढव्यातील टिळेकर नगर-कामठे पाटीलनगर ते येवलेवाडी मुख्य रास्त्याच्या १८ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, विरसेन जगताप, तुषार कदम, महेश किवडे आदी उपस्थित होते.

Pune
Pune : सिंहगडावर अनेक पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

यावेळी स्केटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केलेल्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. टिळेकर यांनी यावेळी सातत्याने महापालिकेकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे सांगितले.

Pune
Pune Fire: पुण्यात आगीचे सत्र सुरुच; मार्केट यार्ड परिसरात गोडाऊनला भीषण आग

या रस्त्याच्या कामांमुळे टिळेकरनगर, पानसरेनगर, कामठेपाटीलनगर परिसरातील नागरिकांना फायदा होणार असून हा रस्ता पूर्ण झाल्यास त्यांना थेट कात्रज-कोंढवा रस्त्यावर येण्यास मदत होणार आहे.

Pune
Mumbai : अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका ऑक्टोबरअखेर सुरू होणार

हा रस्ता एकूण दोन किलोमीटरचा असून यापैकी १४०० मीटर रस्ता हा २४ मीटर रुंदीचा तर ६०० मीटर रस्ता हा १० मीटर रुंदीचा होणार आहे. यावेळी या रस्त्याचे ठेकेदाराने पुढील एक वर्षात रस्ता पूर्ण होऊन नागरिकांसाठी तो खुला करण्यात येईल असे सांगितले. सुनिल कामठे यांनी आभार व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com