

Pune property tax department
sakal
पुणे : मिळकतीला कर लावणे, नाव बदलणे, मोकळ्या जागेचा योग्य कर लावणे, मिळकतीच्या वापरता बदल करणे यासह अन्य कामांसाठी नागरिक मिळकतकर विभागात गेले आणि त्यांचे सहजपणे काम झाले असे होत नाही. त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कागदपत्र मागविणे, नवीन नियम सांगणे, नवीन त्रुटी शोधून काम प्रलंबित ठेवायचे. सगळे व्यवस्थित होत असले तर अचानक फाइल गायब होते असा अनुभव अनेकांना येत आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागात नागरिकांचा छळ सुरु आहे. प्रशासनाविरोधात चिड निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या गप्पा मारणारे अधिकारी ही व्यवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.