

Pune Latest News: भाजपच्या जाहीरनाम्यात पुण्यातील ५०० चौरस फुटाच्या आतील घरांचा मिळकतकर माफ करु, असे आश्वासन देण्यात आले होते. हा प्रस्ताव गुरुवारी (दि. २६) स्थायी समितीच्या समोर चर्चेला आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्याची विरोधकांनीही तयारी दर्शविली होती. मात्र, भाजपने यावर प्रशासनाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेऊ, अशी भूमिका घेऊन याचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे करमाफीचा निर्णय स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत होऊ शकलेला नाही.