
Pune Protest : ...नाहीतर हात सोडून मनसे स्टाईलने आंदोलन करू; मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
Pune Protest- " निसर्गाने समृद्ध असलेल्या वेताळ टेकडीचा ऱ्हास करून विकासाच्या नावाखाली बालभारती ते पौंड फाटा रस्त्याचा जो जबरदस्तीने घाट घातला जात आहे. यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्प प्रशासनाने राबवू नयेत, लक्षणीय उपोषणाच्या माध्यमातून यावेळी प्रशासनाला हात जोडून विनंती करत आहोत,
प्रशासनाने ऐकले नाही तर पुढच्या काळात हात सोडून मनसेच्या पध्दतीने आंदोलन करू". असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवार ( ता.५) पुणे शहर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने 'वेताळ टेकडी वाचवा पर्यावरण संरक्षण व जनजागृती' साठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सेनापती बापट रस्त्या, बालभारती संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर प्रशासनाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या.
मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रणजीत शिरोळे म्हणाले, " विकास कामांना 'मनसे'चा विरोध नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाची हानी करून विकास होत असेल तर त्याला विरोध आहे. महापालिका प्रशासनाने पारदर्शी राहावे,
विकासाचे प्रकल्प कशा पद्धतीने राबवले जाणार आहेत हे नागरिकांसमोर मांडावे, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेयला हव्यात. बालभारती ते पौंड फाटा या रस्त्या संदर्भात प्रशासन नागरिकांना अंधारात ठेवून लपून-छपून परस्पर काही गोष्टी करत आहे. अशा गोष्टींना आमचा विरोध आहे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत".
यावेळी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्या डॉ. सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते ,पर्यावरण प्रेमी, डॉ. कल्याण गंगवाल, समीर सिंदगी मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, बाळा शेडगे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, हेमंत संभुस, साईनाथ बाबर, अमोल शिंदे, प्रवक्ते योगेश खैरे, शहर सचिव संतोष पाटील,
नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर गणेश भोकरे, अजय कदम, सुरेखा होले , नीता पालवे, सुशिला नेटके, संगिता तिकोने, प्रशांत कनोजिया, शशांक अमराळे, धनंजय दळवी, अभिषेक जगताप, अभिषेक थिटे , सारंग सराफ, विशाल पवार, सुनिक लोयरे, दत्ता रणदिवे, अमर अडाळगे, शंकर पवार, सुरज कुसाळकर, परिक्षीत शिरोळे, आकाश धोत्रे वैभव कदम, ऋषिकेश जाधव प्रविण कदम आदी उपस्थित होते.