PUBG Game Incident: पुण्यात 'PUBG' खेळताना घडला थरार!, मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात खरंच सुटली गोळी अन्..

PUBG Game Turns Tragic incident in Pune: पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे, पोलिसांनी पाच तरूणांना ताब्यात घेतलं आहे.
Police officials outside the crime scene in Pune where a youth was injured by a bullet while playing PUBG on a mobile phone; five suspects detained for questioning
Police officials outside the crime scene in Pune where a youth was injured by a bullet while playing PUBG on a mobile phone; five suspects detained for questioningesakal
Updated on

Youth injured in Pune during PUBG gameplay as gunshot accidentally fires पबजी या खेळामुळे आतापर्यंत कितीतरी जणांचे जीव गेले असतील, आपण तशी बातम्याही आतापर्यंत वाचलेल्या आहेत. या भयानक खेळावर बंदी घालण्याबाबतही हालचाली झाल्या होत्या. मात्र तरीही अजूनही पबजी हा खेळ खेळला जात असल्याचे समोर येत आहे. आता पुण्यात या पबजी खेळामुळे एक थरार घडला असून, तरूणाचा जीव थोडक्यात वाचल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी रात्री उशीरा पबजी खेळताना एका तरूणाकडून पिस्तूल लोड अनलोड करण्यामध्ये, काही समजण्याच्या आतच अचानक गोळी सुटली आणि त्याच्या एका मित्राच्या पायत शिरली. दैव बलवत्तर म्हणून ही गोळी बाकी कुठं लागली नाही, अन्यथा त्या मित्राला जीव गमावावा लागला असता. आता या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  हे पाच तरूण एका घरात बसून मोबाइलवर पबजी गेम खेळत होते. दरम्यान एकाने मित्रांना दाखवण्यासाठी त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढलं आणि तो ते पिस्तूल लोड अनलोड करून दाखवू लागला, इतक्यात अचानक गोळी सूटली अन् थेट समोरच बसलेल्य मित्राच्या पायात शिरली, यामुळे तो मित्र गंभीर जखमी झाली.

Police officials outside the crime scene in Pune where a youth was injured by a bullet while playing PUBG on a mobile phone; five suspects detained for questioning
Muslim Headmaster: खळबळजनक! मुस्लिम मुख्यध्यापकास शाळेतून हटवण्यासाठी चक्क पाण्याच्या टाकीतच मिसळले विषारी रसायन

अचानक घडलेल्या या प्रकरामुळे सर्वजण प्रचंड घाबरले होते. यानंतर मग त्यांनी ही घटना कुणाला कळू नये म्हणून एका बनाव केला. ज्यानुसार गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिली. तर इकडे घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं. यानंतर तपास आणि चौकशीत पोलिसांना या तरुणांवरच संशय आला, अखेर पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच या तरूणांना घडला प्रसंग सगळा खराखुरा सांगितला. यानंतर पोलिसांनी ते पिस्तूल जप्त केले असून, सर्व पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com