

Polio Vaccination
पुणे : शहरात रविवारी (ता. २२) राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. निर्धारित उद्दिष्टाच्या ९०.२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना सोमवारपासून (ता. २३) आरोग्य पथकांकडून घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.