Pune : पुण्यधाम आश्रम रस्त्याची चाळण, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष; नागरिकांची नाराजी

पावसामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची आणखीनच दुरवस्था झाली.
Pune
PuneSakal

कोंढवा - कोंढवा परिसरातील कै. दशरथ मरळ चौकातून पुण्यधाम आश्रमाकडे जाण्याऱ्या कै.ह.भ.प. धोंडीबा महादू कामठे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या तत्काळ उपाययोजना करत या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. पावसामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची आणखीनच दुरवस्था झाली असून डी मार्टसमोरून पुढे गेल्यानंतर इंस्पिरा सोसायटीच्या परिसरात लांबच लांब खड्डे पडले आहेत.

त्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे हेसुद्धा कळत नाही.

Pune
Mumbai News : मुंबईकरांनो मच्छरांपासून सावधान ; मलेरिया डेंग्यूच्या रुग्ण संख्येत होत आहे वाढ !

पावसाळी पाण्याची वाहनी नसल्याने पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे निदर्शनास येते.

त्यामुळे रस्ता तत्काळ उखडला जातो आणि दुरवस्था होते. महम्मदवाडीकडे जाणारे नागरिक प्रामुख्याने या रस्त्याचा वापर करतात.

रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा वावर असतो. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुरावस्थेबाबबत अनेकवेळा तक्रारी करूनही सुधारणा होत नाही.

अनेक ठिकाणी खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. ते पाणी दुचाकीचालक, पादचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून येते अशा तक्रारी नागरिक करत आहेत.

Pune
Mumbai News : मुंबईकरांनो मच्छरांपासून सावधान ; मलेरिया डेंग्यूच्या रुग्ण संख्येत होत आहे वाढ !

पावसाळी वाहनीचे काम तत्काळ करण्याची गरज

सदरील रस्ता विकास आराखड्यातील असून रस्त्यावर पावसाळी पाण्याची वाहनी नाही. वाहनीचे काम तत्काळ करण्याची गरज आहे.

मात्र, या रस्त्यावर सद्यस्थितीत पुर्णपणे जागा ताब्यात आली नसल्याने पावसाळी पाण्याची वाहिनी टाकल्यास ती रस्त्याच्या मधोमध येईल.

त्यामुळे जागा ताब्यात आल्यास ती रस्त्याच्या कडेने टाकून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याने या कामाला विलंब लागत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Pune
Pune : दहशतवादी प्रकरणात ‘एटीएस’कडून पुण्यात पाचव्या आरोपीला अटक

रस्त्याची अवस्था वाईट असून तीन ते चार फुट लांबीचे खड्डे रस्त्यावर दिसतात. गाडी चालविणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे रस्त्याची खड्डे बुजवुन दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासन लक्ष देताना दिसत नाही.

- शुभम गायकवाड, स्थानिक नागरिक

सदरील रस्त्यावर पावसाळी पाण्याच्या वाहिनीचे काम करण्यात आलेले नसल्याने पावसाच्या पाण्याने रस्त्याची दुरवस्था होते. मात्र, रस्त्याची पाहणी करण्यात आली. असून तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

- सिद्राम पाटील, शाखा अभियंता, पथ विभाग, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com