Purandar Airport: अदानींची रक्कम उपलब्ध करण्याची तयारी,पुरंदर विमानतळाचा प्रश्‍न २ महिन्यांत मार्गी : उदय सामंत

राज्य सरकार त्या निधीच्या माध्यमातून भूसंपादन करू शकते. या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
उदय सामंत
उदय सामंतsakal
Updated on

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम एका टप्प्यात उपलब्ध करून देणे राज्य सरकारला शक्य नाही. ही रक्कम राज्य सरकारला अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

राज्य सरकार त्या निधीच्या माध्यमातून भूसंपादन करू शकते. या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, लवकरच बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुरंदर विमानतळाचा प्रश्‍न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला दिसेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उदय सामंत
Pune Crime : कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर वार करून खून

सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार संघास भेट दिली, त्या वेळी नियोजित पुरंदर विमानतळासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. राज्यात सत्ताबदल झाला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नुकत्याच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरासाठी विमानतळाची गरज बोलून दाखविली, तर जेजुरी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Relentless Rain Revives Purandar: Karha River Flows Full, Farmers Rejoice
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Purandar International Airport Land Acquisition to Accelerate After June 30 Deadline Extension
Major Boost for Purandar International Airport Project as 1,837 Acres Secured
Marathi News Esakal
www.esakal.com