Pune : पुरंदरमध्ये टँकर मागणीत लोकांप्रमाणे पशुधनही मोजून प्रस्ताव द्या

आमदार संजय जगताप यांची ग्रामपंचायतींना सूचना
आमदार संजय जगताप
आमदार संजय जगतापsakal

सासवड : पिण्याचे पाणी देताना लोकवस्ती गृहीत धरुन टँकर मागणीचा प्रस्ताव न करता गावातील पशुधन लक्षात घेऊन त्यांना द्यावयाचे पाणीही गृहीत धरुन ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे प्रस्ताव द्यावेत. तसेच गावच्या पाणी योजनांची दुरुस्ती, विहीरींचा गाळ काढणे, खोलीकरण, विंधनविहीर दुरुस्ती, जलसंधारण कामांची दुरुस्ती, खोलीकरण आदींचे प्रस्ताव दिले असतील, पाठपुरावा सुरु ठेवावा. ज्यांनी प्रस्ताव दिला नसेल त्यांनी टंचाीस्थिती लक्षात घेऊन ते त्वरीत द्यावेत., असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी सासवड (ता.पुरंदर) येथे तालुका टंचाई आढावा सभेत केले.

सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात पुरंदर तालुका टंचाई आढावा सभ झाली. त्यावेळी आमदार श्री. जगताप बोलत होते. यावेळी तालुका तहसिलदार विक्रम राजपुत, गट विकास अधिकारी डाॅ. अमिता पवार - गावडे, सासवडचे पालिका मुख्याधिकारी निखील मोरे, जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, पंचायत समितीचे पाणी पुरवठा उप अभियंता सचिन घुबे, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे अभियंता महेश कानेटकर, जिल्हा बँकेचे महेंद्र खैरे, माजी जि.प.सदस्य सुदाम इंगळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, सुनिता कोलते, विठ्ठल मोकाशी, हेमंतकुमार माहूरकर, योगेश फडतरे, संदीप फडतरे, मनिषा नाझीरकर, काका पिसाळ आदी उपस्थित होते.

आमदार संजय जगताप
Baramati : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीला पंतप्रधान मोदी यांना बारामतीत आणणार;बावनकुळे

गावोगावच्या सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांनी गावच्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलजीवन मिशनमधून सुरु असून संबंधीत ठेकेदार व यंत्रणा गावाला, ग्रामपंचायतीला विचारात घेत नसल्याची प्रामुख्याने तक्रार झाली. टँकर मागणीचे प्रस्ताव देण्यात ग्रामपंचायती गती घेत नाहीत, पाणी पुरवठ्याच्या विहीरी खोलीकरणात काही गावांत शेजारील विहीरीवाले अडथळे आणतात, टंचाई नियोजन झाल्याप्रमाणे विंधनविहीरी किंवा विहीरी खोलीकरण, पाण्याचे पुनःर्भरण या कामांना अपेक्षित गती नाही. पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जनाई जलसिंचन योजनेचे पाणी दोन महिन्यांपूर्वी सोडले असते तर ही टंचाईची वेळ आता पूर्व भागात आली नसती., अशा तक्रारींचा यावेळी पाऊस पडला.

टंचाई आराखडा करुन त्याच्या अंमलबजावणीला जून महिना उजडून देऊ नये. काही कामे अगोदरच सुरु झाली पाहिजेत., असे सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहूरकर यांनी स्पष्ट केले. जेजुरी पालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले म्हणमाले., जेजुरी कंपन्यांचे, एमआयडीसीचा पाणी पुरवठा व जेजुरी शहराचा पाणी पुरवठा यांचा मेळ नसल्याने तीन दिवसांनी नागरीकांना पाणी मिळते. ही अडचण नियोजनाने दूर करावी.

आमदार संजय जगताप
Pune : पुणे-मुंबई महामार्गावर 'भारत पेट्रोलियम'चा गॅस टँकर पलटी; अधिकाऱ्यांसह 50 पोलीस घटनास्थळी

तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव म्हणाले., पुरंदर तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र 31 हजार 920 हेक्टर आहे. मात्र अद्यापपर्यंत केवळ दोन टक्का वगळता.. 98 टक्के क्षेत्रातील पेरणी माॅन्सूनअभावी रखडलेली आहे. चांगली अोल झाल्याशिवाय पेरणीचे धाडस करु नये.

``पुरंदर तालुका पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातून सोनोरी, वाल्हे गावच्या पाच वाड्या, रिसे गाव व वस्त्या येथे तीन टँकरच्या खेपा सुरु आहेत. पिसे, राजुरी, वागदरवाडी येथील टँकर मागणीचे प्रस्ताव मंजूरीच्या टप्प्यात आहेत. शिवाय दौंडजची मागणी आली, टँकर मागणी प्रस्ताव येईल. तरीही अनेक गावांचे टंचाईस्थिती लक्षात घेता.. टँकर नियोजन तयार ठेवले आहे. पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई व्यापक होऊ लागली आहे.``

- डाॅ. अमिता पवार, गट विकास अधिकारी, पुरंदर

``तालुक्यात धरणे व जलाशयातील गाळ काढण्याची आठ ठिकाणी कामे सुरु आहेत. आणखी प्रस्ताव द्यावेत. विंधनविहीरींच्या दुरुस्तीला विलंब करु नये. उपसा जलसिंचन योजनेच्या विलंबाकडे आपण प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱयांमार्फत लक्ष घालू. टँकर प्रस्तावात पशुधनही गृहीत धरुन लोकसंख्येनिहाय नियोजन करा.``

- विक्रम राजपुत, तहसिलदार ः पुरंदर

``पुरंदरला खुप वर्षांनी टंचाईस्थिती निर्माण झाली आहे. यात राजकारण कोणीही करु नये, ही विनंती आहे. सर्वांनी मिळून लढा देऊ. पुरंदर किंवा जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईस्थिती म्हणून मोफत देण्याचा ठराव ही सभा करीत आहे. त्याला माझे पत्र देऊन शासनाकडे पाठपुरावा करुन मोफत पाणी सोडण्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे.``

- संजय जगताप, आमदार ः पुरंदर-हवेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com