Rabi Sowing Crisis: रब्बी पेरणीवर दुष्काळाचे सावट गडद ;ओलावा नसल्याने पेरा निम्म्यावर : जिल्ह्यात ३७ हजार ९८४ हेक्टरची घट

Pune Rabi Sowing Declines : जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी पाणी कमी असल्याने पुणे जिल्ह्यात रब्बी पेरणीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत ३५ हजार ६६० हेक्टरवर पेरा झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात ३७ हजार ९८४ हेक्टरची घट झाली आहे.
Farmers in Pune district face water scarcity and delayed Rabi sowing.

Farmers in Pune district face water scarcity and delayed Rabi sowing.

esakal

Updated on: 

पुणे, : ‘‘पावसाळा संपला, पण जमिनीत ओलावा नाही. विहिरींचे पाणीही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत रब्बीची पेरणी करायची तरी कशी? केली, तरी पिकाला पाणी कुठून द्यायचे?’’ असा सवाल शिरूर येथील महिला शेतकरी सारिका इंगळे करतात. त्यांची ही व्यथा सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

जिल्ह्यात सध्या सिंचनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरणीवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ३५ हजार ६६० हेक्टरवर पेरणी झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ३७ हजार ९८४ हेक्टरने पेरा घटला आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या केवळ १९ टक्के पेरणी झाल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हींबाबत चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...