

Police are examining CCTV footage to identify the accused, who allegedly entered the shop wearing PPE-like protective clothing.
Sakal
राहू, (जिल्हा-पुणे) : राहू (ता. दौंड) येथील मुख्य चौकातील नीलकंठ ज्वेलर्स दुकानाचे आज रविवारी पहाटे (ता .१९) सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी प्रवेश करते वेळीच दुकानातील सेंसर चा आवाज आला. दरम्यान संबंधित जलदुकांच्या मालकाच्या मोबाईलवर त्यांना सूचना संदेश आल्याने त्यांनी त्वरित राहू येथील सुभाष अण्णा कुल कॉम्प्लेक्सचे मालकाला तातडीने संपर्क साधला. दरम्यानच्या काही कालावधीतच अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सोने, चांदी, इतर मौल्यवान दागिने असा साधारणता सात ते आठ लाख रुपयांचा ऐवज त्यांनी एका पिशवीत भरला. मौल्यवान ऐवज चोरटे घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच दरम्यान गावातील एक तरुणाची चार चाकी गाडी तेथे आल्यानंतर चोरट्यांनी प्रसंग अवधान राखत तेथून चोरटे पसार झाले.