
पुणे : हडपसर व खडकी टर्मिनल येथील यार्ड व मार्गिका जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम जुलैअखेरपर्यंत पूर्ण होईल. याच्या व्यतिरिक्त अन्य प्रवासी सुविधा वाढविण्यावरदेखील भर दिला जात आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन या दोन्ही स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे. अद्याप नवीन रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली नसली तरीही खडकी येथून मुंबई व गुजरातच्या दिशेने व हडपसर येथून सोलापूर व दक्षिण भारताच्या दिशेने नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या कोणत्याही गाड्यांचे टर्मिनल मात्र बदलणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.