पुणे : हडपसर टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर व स्थानकाबाहेरहीदेखील पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. नवा रस्ता आणि शटल सेवा अशा सुविधा प्रवाशांसाठी केल्या जात आहेत..सध्या १०० मीटर लांब व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. ऑगस्टअखेर ते पूर्ण होईल. हा रस्ता तयार झाल्यानंतर ‘पीएमपी’ हडपसर ते हडपसर टर्मिनल अशी शटल सेवा सुरू करेल. हे टर्मिनल विकसित झाल्यानंतर या स्थानकावरून रेल्वे गाड्या व पर्यायाने प्रवाशांची वाहतूक वाढेल. सध्या तेथे येण्यासाठी अत्यंत अरुंद रस्ता आहे. हा रस्ता पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येतो..रस्त्याची लांबी वाढविण्यास मर्यादा असल्याने रेल्वे प्रशासनाने आपल्या ताब्यातील इमारती व कार्यालय पाडून त्या ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवाशांच्या मोटारी व ‘पीएमपी’ची ‘मिडी बस’ टर्मिनलपर्यंत कोणत्याही अडचणीविना दाखल होऊ शकतील. या शिवाय रेल्वे प्रशासन स्थानक परिसरातच वाहनतळासाठी जागा उपलब्ध करणार आहे. तेथेच ‘पीएमपी’च्या बस दाखल होतील आणि सुटतील..तीन ‘शटल’पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी हडपसर टर्मिनल ते हडपसर आगार अशी सेवा सुरू करणारही ‘फिडर’ सेवा असणार असून, त्यासाठी तीन बसचा वापर होणाररेल्वेगाड्यांच्या वेळेनुसार बस धावणार‘फिडर’ सेवेमुळे प्रवाशांना कमी दरात प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार.हडपसर टर्मिनलसध्या १४ डेमूंना थांबा१० मेल एक्स्प्रेसना थांबादैनंदिन सुमारे चार हजार प्रवाशांची वाहतूकनवे टर्मिनल सुरू झाल्यावर प्रवासीगाड्या व प्रवाशांची संख्या वाढणार.प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन नवा रस्ता बांधत आहे. ऑगस्टअखेर हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. नव्या रस्त्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. त्यांना स्थानकावर येणे-जाणे सोपे होणार आहे.- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणेहडपसर टर्मिनलहून प्रवासी सेवेचा विस्तार केला जाणार आहे. या ठिकाणी ‘फिडर’ सेवा दिली जाणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हडपसर ते हडपसर टर्मिनल अशी सेवा सुरू केली जाईल.- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.