

Pune Railway Meeting 13 MPs Seek Better Safety Facilities New Trains and Faster Development of Railway Stations
sakal
पुणे: प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि गैरसोयींचा मुद्दा ऐरणीवर घेत तब्बल १३ खासदारांनी बुधवारी रेल्वे प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. पुण्यात पार पडलेल्या बैठकीत खासदारांनी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनीही पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेत, प्रवाशांच्या सोयींशी तडजोड खपवून घेणार नाही, असा सज्जड दमच रेल्वे अधिकाऱ्यांना भरला.