
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर प्रचंड अस्वच्छता निर्माण होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, लघुशंका करणे यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. देशभरातून नागरिक पुण्यात येताच त्यांनी अस्वच्छतेचे दर्शन होत आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे तक्रार करून परिसर स्वच्छ ठेवावा, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर करवाई करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.