Pune News : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे. हा फोन कॉल मनमाड परिसरातून करण्यात आला होता अशी माहिती आहे. त्यानंतर आता या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं आहे.

हे ही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

काल रात्री अज्ञात इसमाने फोन करून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच परिसराची पाहणी केली होती. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचं प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली होती. रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेमुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : सभेत डुलकी घेणाऱ्या भाजप नेत्यांच्या व्हिडीओवर बावनकुळे म्हणतात...

टॅग्स :policepunerailway