Pune Railway Station : मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी; विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
Naming Controversy : पुणे रेल्वे स्थानकाचे नामकरण बाजीराव पेशवे यांच्या नावाने करावे, या मागणीनंतर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर झालेल्या बदनामीच्या फलक प्रकरणी कारवाईची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणारे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.