
Pune Railway Station name change controvers
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ब्राह्मण महासंघाने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने पुणे रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याची मागणी केली आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महासंघाने स्थानकावर ‘थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानकावर हार्दिक स्वागत’ असे फलक लावले आहेत. दुसरीकडे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मस्तानीच्या नावाने फलक लावण्याची मागणी केल्याने हा वाद अधिकच तीव्र झाला आहे.