Pune News: प्रवासी ‘कोंडी’त पुणे रेल्वे स्थानकावर अडथळ्यांची शर्यत

Severe Traffic Congestion Around Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अवघ्या काहीशे मीटर अंतरासाठी प्रवाशांना अर्धा तास खर्च करावा लागत असून, अनेकांची रेल्वेही चुकत आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे : पुणे रेल्वे स्थानक सध्या चारही बाजूंनी वाहनांच्या चक्रव्यूहात अडकले असून, रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच कोंडीचा मनस्ताप सुरू होतो. स्थानकापासून अवघ्या ५०० मीटर अंतराचा टप्पा पार करण्यासाठी प्रवाशांना २५ ते ३० मिनिटे झुंजावे लागत आहे. स्थानक परिसरातील बेशिस्त पार्किंग, मुख्य प्रवेशद्वारासमोरील गर्दी आणि सायंकाळची विस्कळीत वाहतूक यामुळे शेकडो प्रवाशांची गाडी चुकत आहे असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com