

Real-time Passenger Complaint Redressal
Sakal
पुणे : पुणे स्थानकावरून रोज सुमारे दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाने पुण्याच्या नियंत्रण कक्षात पहिल्यांदाच ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याला प्रतिसाद दिला जातो. तर त्या तक्रारीचा निपटारादेखील वीस मिनिटांच्या आत केला जातो. परिणामी स्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.