Pune : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना ‘क्यूआर कोड’ने तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway

Pune : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना ‘क्यूआर कोड’ने तिकीट

पुणे : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. कारण मोबाईलवरच क्यूआर कोडद्वारे तिकीट मिळत आहे. यामुळे कागदाचीही बचत होणार आहे. त्यासाठी प्रवाशांना यूटीएस मोबाईल तिकिटिंग हे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर लोकल व मेल एक्स्प्रेसच्या जनरल तिकिटासाठी नेहमीच मोठी रांग लागलेली असते. यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. पुणे स्थानकावर तिकीट खिडकीवरून व एटीव्हीएमवरून प्रवाशांना जनरल तिकीट मिळते. यात सर्वाधिक गर्दी तिकीट खिडकीवर असते. अनेकदा एटीव्हीएम मशिनमध्ये बिघाड होतो तर कधी तिथे रेंजची अडचण आल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यात अडचणी येतात. क्यूआर कोडवरून तिकीट काढताना याची अडचण येणार नाही, याची काळजी घेतली आहे. जनरल तिकीट केंद्राजवळ क्यूआर कोडचे बॅनर लावण्यात आले आहे.

पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, मळवली स्थानकांवर क्यूआर कोडने तिकीट काढण्याची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Web Title: Pune Railway Stations Passengers Qr Code New System On Mobail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..