
पुणे : तब्बल १६६ वर्षांनंतर पुण्यात रेल्वेसेवेचा सांधा बदलला जात आहे. पुणे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर व खडकी टर्मिनल विकसित केले जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत दोन्ही स्थानके विकसित होतील. त्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे २५ रेल्वेगाड्यांचे विकेंद्रीकरण होणार आहे. हडपसर व खडकी स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढेल. परिणामी पुणे स्थानकावरील गाड्या व प्रवाशांची संख्या कमी होण्यास मदत होईल. २५ गाड्यांचे विकेंद्रीकरण झाल्यानंतर पुणे स्थानकावरील प्रवाशांची संख्या किमान ६२ हजारांनी कमी होण्याची शक्यता आहे.