
पुणे : हडपसर टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्रशासन स्थानकावर व स्थानकाच्या बाहेरदेखील पायाभूत सुविधांवर भर देत प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन रस्ता बांधत आहे. रेल्वे प्रशासन १०० मीटर लांबीचा व साडेसात मीटर रुंदीचा रस्ता करीत आहे. येत्या दोन महिन्यांत हा मार्ग पूर्ण होईल. हा रस्ता तयार झाल्यावर प्रवाशांना हडपसर स्थानकावर येणे अत्यंत सोयीचे होणार आहे. हडपसर स्थानकाच्या पाठीमागच्या बाजूला हा रस्ता तयार करण्यात येत आहे.